भूमिका

  • Home |
  • भूमिका
01

भूमिका

देशाभिमानाची मुस्कटदाबी सहन करायला पाहिजे होती काय? हिंदुत्वाची विवंचना संपवून घ्यायला पाहिजे होती काय? कधी ना कधी संघमांचा कडेलोट होणारच होता, जो त्या दिवशी झाला. जनसामान्यातून उठून कुणी नरशार्दूल, दुटप्पी राजकारणाचा संहार करणारा होणारच होता, जसा त्या दिवशी झाला. परम वंदनीय मातृभूमीचे तुकडे करण्याच्या पराकाष्ठेच्या वृत्तीला आळा घालणारा गरजवंत होता, तो त्या दिवशी घातला गेला....

ऐतिहासिक दिवस ३० जानेवारी १९४८

तो दिवस होता ३० जानेवारी १९४८....!

मुसद्दी, ध्येयशील ह. पं. नथुराम गोडसे ह्यांनी आपली भूमिका मांडताना केलेले परखड वक्तव्य ऐका... खराखुरा इतिहास जाणून घ्या!

02

पार्श्वभूमी

ज्या भूमीवर हिंदू संस्कृती विकसित झाली, त्या भूमीचा एक तृतीयांश भाग अलग करण्यात आला. इंग्रजांनी अनेक वर्षे संधिसाधूपणे रुजविलेली फुटीरतावादी धोरणा यशस्वी झाले आणि एका देशात धर्माच्या स्वातंत्र्याचा लढा पेटला गेला. तो देश स्वतंत्र होताना दोन देशात विभागला गेला. देशाचे तुकडे करण्याचे असतील तर माझ्या प्रेतावरून करा' असे मोठेपणाचा आव आणून उद्धरणाऱ्या महानतेने परधर्मीयांना झुकतं माप दिलं. एवढंच नाही तर, ते त्यांना ५५ कोटी रुपयांची 'घरचा आहेर' देण्यासाठी सज्ज झाले.

हा अक्षय्य अपराध पोटात घालतो तर तो जातीचा हिंदू कसला...? धैर्यदापणे बंदुकीचा चाप ओढणाऱ्या हातातील लेखणीने कागदावर उतरलेली ती अजरामर होतावयाची एका 'मान्यवर न्यायार्थी' मध्ये.

03

तात्कालिक परिस्थिती

ऐतिहासिक कालखंड १९४८

१९४८ साली परिस्थिती बिकट होती. देशाचे विभाजन होऊन सर्वत्र धर्मयुद्ध माजले होते. निरपराध हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत होते. धगधगलेल्या मनात अंध:कार आणि द्वेष दाटला होता. आणि याला कारणीभूत असलेले स्वधर्मघातकी नेतृत्व प्रार्थनासभा घेण्यात मग्न होते. यांना राजकीय पटलावरून दूर करण्याशिवाय गत्यंतर होते का...?

तर्कक्लिष्ट घटना आणि बाबतचे उदाहरणे श्री. नथुराम गोडसे यांच्या शब्दात ऐका. आजवर जे आपल्यापासून हेतुपुरस्सर दूर ठेवले गेले, ते राजकीय परिस्थितीचे विश्लेषण एका 'मान्यवर न्यायार्थी' मध्ये.

04

चिंतन

सत्यशोधक वृत्तीने झाल्या घटनेची, तटस्थपणे शहानिशा करायची वेळ येऊन ठेपली आहे. किती दिवस आपण पाठ्यपुस्तकात वर्णिलेल्या एकांगी इतिहासावर विश्वास ठेवणार?

दिशाभूल करणाऱ्या तपशीलांवर आपली मते बनविणार? धैर्यशून्य, नेभळट राजकारणाला तेसनाबूत करणाऱ्या साहसी कृत्याचा आपण डोळसपणे वेध घेणार की नाही...? सत्य उघडून काय घाबरणार नाही?

साथीला आहे श्री. नथुराम गोडसे यांची अमोघ विचारशक्ती, शिवराय, राणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांच्याशी नातं सांगणारा लढवय्या हिंदुत्ववाद...!

Flexible Premium

Life insurance policies can be tailored to fit your needs