विलासपूर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात, हिंदू समित्यांच्या विधायक कार्याबद्दल स्पष्टता देताना, त्यांनी हिंदुमहासभेचे संपूर्ण हिंदुस्थानातील सर्व हिंदू संस्था आणि समित्यांशी असलेल्या संबंधांबाबत मार्गदर्शन केले. हिंदुमहासभेच्या सर्व स्थानिक आणि जिल्हाव्यापी समित्यांनी या सर्व समित्या आणि संस्थांशी अत्यंत मैत्रीपूर्ण आणि नम्र संबंध ठेवले पाहिजेत; इतकेच नव्हे तर विविध संस्थांच्या कार्याचा समन्वय साधण्यासाठी त्यांनी सक्रिय राहिले पाहिजे. प्रतिस्पर्ध्यांशी नम्र आणि प्रेमळ संबंध ठेवणे ही हिंदुमहासभेची राजकीय शपथ आहे आणि सर्व प्रकारच्या हिंदूंना एकत्र आणणे हे तिचे विधायक कार्य आहे. हे विधायक कार्य इतके व्यापक आहे की त्यामध्ये सर्व हिंदूंच्या प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आणि संकटांचा समावेश होतो.
परंतु, डॉ. मुखर्जी यांनी म्हटल्याप्रमाणे, इतक्या मोठ्या प्रमाणावर विखुरलेल्या हिंदू समित्या आणि संस्थांचा समन्वय आणि एकजूट साधण्याची कल्पना अनेकांच्या मनात सहजासहजी येत नाही. किंबहुना, हिंदुमहासभेचे विधायक कार्य भक्कमपणे पुढे जात नाहीये; त्यामुळे सर्वत्र पसरलेल्या हिंदू सभेच्या सर्व सदस्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी कार्याला मोठी गती द्यावी, जेणेकरून ते लोकांसमोर मांडता येईल. डॉ. मुखर्जी यांच्या मते, राजकीय पक्षाच्या देशव्यापी प्रतिनिधींच्या सदस्यत्वापैकी २५% कार्य प्रामुख्याने मते गोळा करणे, मूल्यांची अभिव्यक्ती करणे आणि त्यांचा प्रचार करणे यासाठी असते. पक्षाचे खरे कार्य अशा अनेक लोकांकडून केले जाते जे विचार आणि संस्थांमुळे प्रेरित झालेले असतात. हिंदुसमाज हेच हिंदुमहासभेचे एकमेव कार्यक्षेत्र आहे. हा समाज हजारो वर्षे प्राचीन आहे आणि येथील अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांना मोठी पार्श्वभूमी असून त्या अनेक वर्षांपासून सर्वपरिचित आहेत. ‘सहकारी संस्था’, ‘समाजसेवा’ ही काही अलीकडची नावे आहेत, जी ऐकून काही अशिक्षित लोक हे काही नवीन तंत्र आहे का, असे विचारू शकतात. परंतु ब्रह्मचर्य, भजनमंडळ, मंदिर, पंचसमिती, जाती पंचायत, मठ, गुरू आणि शिष्यांचा मेळावा हे असे काही शब्द आहेत जे अशिक्षित, वृद्ध, तरुण सर्वांनाच माहीत आहेत. हिंदुसमाजाला एका छत्राखाली एकत्र आणणाऱ्या आणि जोडणाऱ्या या प्राचीन संस्थांच्या प्रगतीमध्ये परकीय सत्तेच्या आक्रमणामुळे अडथळा निर्माण झाला आहे. हिंदू समाजशास्त्राच्या अनेक ग्रंथांमध्ये आणि इतिहासकारांनी व सुज्ञ लोकांनी याचा उल्लेख केला आहे. या सर्व परंपरांची पुनर्बांधणी करणे हेच बहुतांश हिंदू पक्षांचे ध्येय आहे. उदाहरणार्थ, अनेक सरकारी अधिकाऱ्यांनीही हे मान्य केले आहे की, जर इंग्रजांनी आपल्यावर आक्रमण केले नसते, तर आजही लाखो गावकरी हिंदूच राहिले असते.
डॉ. मुखर्जी यांनी सल्ला दिला आहे की, केवळ अनेक सामाजिक आणि धार्मिक पक्षांनाच एकत्र आणून त्यांचा समन्वय साधू नये, तर या प्राचीन सांस्कृतिक संस्थांकडेही लक्ष दिले पाहिजे. मंडला जिल्ह्यातील गोंडांचा प्रश्न समोर आल्यानंतर, ती समस्या सोडवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी श्री पांचलेगावकर महाराज आणि त्यांच्या शिष्यांकडे धाव घेतली, हा एक अत्यंत दूरदृष्टीचा आणि शहाणपणाचा निर्णय होता, हे दिसून येते.
जबलपूर येथील ‘शक्ती’चे संपादक श्री. नथुराम शुक्ला यांनी नुकतेच त्यांच्या एका अंकात प्रसिद्ध केले आहे की, आर्य समाज, हिंदू धर्म सेवा संघ आणि पांचलेगावकर महाराज या तिघांनीही मंडला जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्रपणे प्रयत्न सुरू केले. परंतु आर्य समाज आणि सेवा संघाचे प्रयत्न आणि बरेच श्रम वाया गेले, तर दुसरीकडे पांचलेगावकर महाराजांनी गोंडी भाषा शिकून घेतली, त्यांच्या अन्नाची सवय लावून घेतली आणि कडाक्याच्या थंडीतही आपल्या शारीरिक त्रासांची पर्वा न करता आपल्या शिष्यांसह गोंड लोकांमध्ये लांबचा प्रवास केला. यामुळे ते या लोकांमध्ये लोकप्रिय झाले आणि त्यांच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळाले. अर्थात, जर इतर पक्षांनीही पांचलेगावकर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पद्धतीने काम केले, तर तेदेखील समन्वयाच्या प्रगतीस मदत करू शकतात आणि डॉ. मुखर्जी यांनी म्हटल्याप्रमाणे योग्य कार्य पुढे जाऊ शकेल. योग्य मार्ग दाखवणे हाच मंडला जिल्ह्याचे उदाहरण देण्यामागचा एकमेव उद्देश आहे.
प्रत्येक सदस्याचे ध्येय एकच आहे, परंतु कोणीही अहंकारासाठी किंवा प्रसिद्धीच्या मोहापायी आणि अनावश्यक व अस्वस्थ स्पर्धेसाठी काम करू नये. योग्य परिणाम साधण्यासाठी या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत.
अनुवादक: सौ. वितस्ता काशीकर







